महाराष्ट्र मास्टर्स अथलेटिक मीटचे यजमानपद औरंगाबादला दोन दिवसीय वार्षिकसर्वसाधारण सभा शहरात संपन्न,खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या साक्षी चव्हाण चा सत्कार
महाराष्ट्र मास्टर्स अथलेटिक मीटचे यजमानपद औरंगाबादला दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभा शहरात संपन्न औरंगाबाद 18 जून शहरात संपन्न झालेल्या दोनदिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रस्तरीय मास्टर्स अथलेटिक स्पर्धेचे यजमानपद औरंगाबादला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा औरंगाबादेत या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र अथलेटिक संघटनेचे अध्यक्ष तथा ऑलिम्पियन आदिल सुमारीवला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभा औरंगाबादेत शुक्रवारी आणि शनिवारी पार पडली. शुक्रवारी पहिल्या दिवशी संघटनेची कार्यकारी समितीची बैठक पार पडली. शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत स्पर्धांचे वेळापत्रक एकमुखाने अंतिम करण्यात आले, आदिल सुमारीवाला यांनी सांगितले. महाराष्ट्रस्तरीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धाचे यंदाचे यजमानपद औरंगाबादला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष सुमारीवाला...