स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*
प्रतिनिधि :स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन, मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक; महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*
शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या वीज मीटर संदर्भातील विविध समस्यांबाबत औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया, नवीन मीटर मिळण्यास होणारा विलंब, खराब व बंद मीटर वेळेत बदलून न देणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज बिले तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे काँग्रेसच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले.
महावितरण ही नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित सेवा असून ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, सदोष मीटर त्वरित बदलण्यात यावेत, चुकीच्या बिलांची चौकशी करून दुरुस्ती करावी, प्रलंबित मीटर जोडण्यांचे अर्ज निकाली काढावेत तसेच प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार टाकणे योग्य नाही. प्रशासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, शेख अथर, डॉ. पवन डोंगरे, इंजि. विशाल बन्सवाल, आमेर अब्दुल सलीम, मोहम्मद जाकेर, मोहसीन खान, मोईन कुरेशी, योगेश थोरात, शेख नवीद, शफीक शहा, इरफान पठाण, नदीम सौदागर, शेख जमील, शब्बीर पटेल, मुदस्सिर अन्सारी, शेख जहीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.