ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प
छत्रपती संभाजीनगर: मानवाधिकार क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या 'ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट' (GHRT INTERNATIONAL) चा ६ वा वर्धापन दिन आज बुधवारी, १ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्याचे स्वागत पदाधिकाऱ्यांनी पुस्तक देऊन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे महाराष्ट्र चॅप्टरचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष (लाचलुचपत प्रतिबंध विभाग) डॉ. विनायक अप्पाराव सरवदे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून गेल्या ६ वर्षांतील संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि या वर्धापन दिन सोहळ्याचे महत्त्व विशद केले. मानवाधिकार रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला.
या सोहळ्याचे अध्यक्षपद विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. श्री. चंद्रकांतजी गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, देवगिरी कॉलेजचे मा. प्रा. डॉ. बाळासाहेब शिंदे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून LIC ऑफ इंडिया, सिडको शाखेचे उपशाखाधिकारी श्री. राजेश इंगोले यांनी हजेरी लावली.
यावेळी संस्थेच्या विविध पदाधिकारी आणि सदस्यांची विशेष उपस्थिती होती, ज्यामध्ये श्री. दत्ताभाऊ राजगुरू, श्री. रविंद्र किर्तीशाही, सौ. स्वाती सरवदे, प्रा. डॉ. सुधाकर नवसागर, सौ. ममता हिवाळे, डॉ. सुनील नागरगोजे आणि श्री. विजयानंद साळवे यांचा समावेश होता.
"मानवाधिकारांचे रक्षण, हेच आमचे कर्तव्य!" या ध्येयवाक्याचा पुनरुच्चार करत, या कार्यक्रमातून सामाजिक विकास आणि राष्ट्र उभारणीसाठी अधिक कार्य करण्याची ऊर्जा उपस्थितांना मिळाली सूत्रसंचालन ममता हिवाळे यांनी केले. शेवटी डॉ. विनायक अप्पाराव सरवदे यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.