"सांख्यिकी" दिवसाचे औचित्य साधून शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोश 2021 याकरिता केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीमती अपर्णा गिते आहरण व संवितरण अधिकारी यांची गौरव करण्याकरिता निवड करण्यात आलेली आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 29 जून हा दिवस सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोश 2021 याकरिता केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीमती अपर्णा गिते आहरण व संवितरण अधिकारी यांची गौरव करण्याकरिता निवड करण्यात आलेली आहे. श्रीमती अपर्णा गिते या पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) औरंगाबाद शहर, औरंगाबाद येथे सेवेत असून त्यांच्या नियत प्रशासन शाखा, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, शहर वाहतूक शाखा, पासपोर्ट शाखा, महिला तक्रार निवारण शाखा, दामिनी पथक, अति शीघ्र दल, अशा लहान मोठ्या 40 जबाबदाऱ्या पार पाडताना अतिरिक्त जिल्हा समादेशक, होमगार्ड औरंगाबाद हि सुध्दा जबाबदारी तितक्याच ताकदीने व सक्षमपणे सांभाळून शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोश 2021 याकरिता केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्या साकुर येथील सुप्रसिद्ध गणित शिक्षक चांगदेव गीते व लीलाताई गिते यांच्या कन्या असून, निंभाळे गावचे सचिन केने, कृषी अधिकारी यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत.