*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त भारतनगर येथे पक्ष स्थापना.*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त भारतनगर येथे पक्ष स्थापना.*
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सचिव शारदाताई चव्हाण यांनी आयोजित केलेल्या भारतनगर (नवनाथ नगर) विश्वकर्मा मंदिर जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा स्थापना करण्यात आली.पक्षाच्या शाखेचे उद्घाटन प्रदेश चिटणीस प्रा.माणिकराव शिंदे यांनी केले.अध्यक्षस्थानी औरंगाबाद शहर पुर्व कार्याध्यक्ष जावेद खान प्रमुख उपस्थिती शहर महिला पुर्व अध्यक्ष मंजुषाताई पवार,,प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान होते.यावेळेस प्रदेश चिटणीस प्रा.माणिकराव शिंदे यांनी आपल्या उद्घाटपर भाषणात सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त शहरात विविध लोकाभिमुख कार्यक्रम घेण्यात येत आहे.तसेच विविध वार्डात शाखा स्थापन करण्यात येत आहे.तसेच पुर्व कार्याध्यक्ष जावेद खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पक्ष वाढीसाठी घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडला व त्याचाच एक भाग म्हणून डोर टू डोर वर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टीकर लावण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून नवनाथ नगर येथे स्टीकर लावण्यात आले.पुर्व महिला शहर अध्यक्षा मंजुषा पवार यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगीतल्या प्रमाणे अंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याचे तंतोतंत पालन करून लोकाभिमुख कार्य शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चालू असल्याचे सांगितले.तसेच या प्रसंगी इतर मान्यवरांचे भाषण झाले.त्यानंतर घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टीकर लावण्यात आलेत.व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळेस पश्चिम महिला शहर अध्यक्षा शकीला खान,भारत कदम पाटील,अंकुश जाधव, संघमित्र खंडारे,सुरेखा जगताप,शेख नवाज,सय्यद याकूब,शेख अन्सार,शौकत पठाण,इत्यादी उपस्थित होते.तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.