काँग्रेसला पुन्हा झटका... इब्राहिम भय्या पटेल यांनी दिला राजीनामा

काँग्रेसला पुन्हा झटका... इब्राहिम पटेल यांनी दिला राजीनामा
औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेवून शहरात काँग्रेस मजबूत करण्यासाठी योगदान देणारे शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा किराडपूरा वार्डाचे माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी औरंगाबाद शहराचे नामांतराला विरोध केला नसल्याने आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे मुस्लिम बहुल वार्डात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षात प्रवेश करुन विविध पदावर पोहोचले तरीही पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहुन एकनिष्ठ पणे काम करत होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कैबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला असल्याने मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे. शहरातील शेकडो पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. काँग्रेसला शहरात झटक्यावर झटके बसत असताना वरिष्ठ नेत्यांकडून राजीनामा सत्र रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.
9762514814

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न