ओरिऑन सिटिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या किडनी प्रत्यारोपणविभागाची यशस्वी वाटचाल *****

ओरिऑन सिटिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या किडनी प्रत्यारोपण
विभागाची यशस्वी वाटचाल *****
औरंगाबाद :ओरिऑन सिटिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण विभागाची सुरुवात जानेवारी २०२२ पासून झाली
यामध्ये आजपर्यंत १० पशस्वी किडनी प्रत्यारोपण झालेले आहेत. यामध्ये
रक्तगट जुळत असलेते किडनी प्रत्यारोपण (living donor kidney transplant)
रक्तगट जुळत नसलेले किडनी प्रत्यारोपण (ABO Incompatible Kidney transplant)
अदलाबदती असलेले किडनी प्रत्यारोपण (swap Kidney transplant)
अवपदानातून प्राप्त झालेले किडनी प्रत्यारोपण (cadaver Kidney transplant)
अशाप्रकारचे किडनी प्रत्यारोपण आजपर्येत हॉस्पिटल मध्ये यशस्वीरीत्या झाले असून सर्व पेशंट व डोनर निरोगी आयुष्य जगत आहेत.
हॉस्पिटल मध्ये कोविड काळानंतर मराठवाड्यातील दुसरे अवयव दान झाले आहे या अवयवदानामध्ये दोन रुग्णांना किडनी,एक पकृत एक हृदय रुग्णांना प्राप्त झाले असून ज्यारुग्णांना हे अवयव मिळाले आहे त्या सर्वांची प्रकृती उत्तम आहे व प्रत्यारोपण हि यशस्वी झाले आहे अवयव दानाबद्दल जनजागृती व्हावी या साठी हॉस्पिटल मध्ये अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत तसेच या माध्यमातून ज्यारुग्णांना डोनर उपलब्ध नाही अशा रुग्णांसाठी (ZTCC cadaver Kidney transplant) नोंदणी हॉस्पिटल मार्फत करण्यात येत आहे.
ज्या रुग्णांकडे रक्तगट जुळत नसलेला डोनर असेल त्यांना आदी प्रत्यारोपणासाठी पुणे मुंबईला जावे लागत होते व खर्दिक प्रत्यारोपण करावे लागत होते परंतु रक्तगट जुळत नसलेले किडनी प्रत्यारोपण (ABO Incompatible Kidney transplant) ची सुरुवात या हॉस्पिटल मध्ये झाली आहे. अशा प्रकारचे पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे ज्या रुग्णांनकडे रक्तगट जुळत नसलेते डोनर असतात अशा दोन जोड्यांची अदलाबदल करून त्यांचे किडनी प्रत्यारोपण घडवून आणते जाते पाला अदलाबदली असलेले किडनी प्रत्यारोपण (swap Kidney transplant) असे म्हणतात अशाप्रकारचे किडनी
प्रत्यारोपण सुद्धा हॉस्पिटल मध्ये झाले असून स्वॅप पेशंटसाठी स्वॅप नोंदणीची सुरुवात आपण केली आहे.
त्याच प्रकारे रक्तगट जुळत असलेले किडनी प्रत्यारोपण (iving donor kidney transplant) गुंतागुंतीच्या अवघड शास्तक्रिया आपल्या रुग्णालयामध्ये यशव्वीरित्या झाले आहे. आजपर्यंत सर्व किडनी प्रत्यारोपण शास्तक्रिया झालेले रुग्ण निरोगी व नॉर्मल
आयुष्य जगत आहे.
समाजामध्ये अवयवदान काळाची गरज आहे त्या बाबतीत मोठया प्रमाणावर जनजागृती व्हावी म्हणून यामध्ये सर्वांचा पुढाकार हवा त्याच प्रमाणे किडनी आजाराबद्धल माहिती असणे व वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. व गरज पडल्यास किडनी
प्रत्यारोपण हा एक चांगला मार्ग आहे. अशीमाहिती वरिष्ठ किडनी विकार व किडनीप्रत्यारोपण तज्ञ डॉ. श्रीगणेश बर्नेला यांनी दिली.
ओरिऑन सिटिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार रुग्णांना मिळावा  या साठी हॉस्पिटत प्रयत्नशील आहे यामध्ये हृदयरोग मेंदुरोग, मेंदूशास्त्रक्रिया, छातीरोग, अतिदक्षता, कान नाक घास, अस्तिरोग,मूत्ररोग विभाग व किडनीप्रत्यारोपण विभागासाठी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त विशिष्ट डॉक्टर, स्टाफ, वार्ड रूम्स,
IUC, ऑपरेशन थियेटर यांची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे किडनीप्रत्यारोपन सर्जन, विशेष भूलतज्ञ टीम, आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत.
तसेच इतर हॉस्पिटलच्या तुलने मध्ये माफक दरामध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुरुवात केली आहे. भविष्यामध्ये काळानुरूप होणाऱ्या बदलानुसार नवतंत्रज्ञानाचा वापर करून किडनी प्रत्यारोपण केले जाईल याचा फायदा रुग्णांना मोठया प्रमाणात होईल अशा सुविधांचा लाभ रुग्णांनी घ्यावा अशी माहिती
हॉस्पिटलचे CMD डॉ. आशिष देशपांडे, CEO डॉ. वीरेंद्र वडगावकर, व हॉस्पिटत व्यवस्थापन समितीचे डॉ शिरीष देशमुख,डॉ योगेश वरगंटवार, डॉ. आशिष देशमुख, डॉ सुनील जाधव, डॉ. पांडुरंग वट्टमवार, डॉ. प्रविण सोनवतीकर, डॉ. राजकुमार धुमरे
डॉ. योगेश देवगिरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली .

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न