आमदार संजय शिरसाट यांचा शहरात जंगी स्वागत,विमानतळ ते कोकनवाडी संपर्क कार्यालय प्रयंत भव्य कार मिरवणूक ,जागोजागी सत्कार



आठ दिवस मातोश्रीची दारे बंद करा, चांडाळ चौकडी गुदमरुन मरेल

आमदार संजय शिरसाट यांचा संजय राऊतांसह सुभाष देसाईंवर निशाणा

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट हे औरंगाबाद  शहरात दाखल झाल्यानंतर विमानतळ ते कोकनवाडी येथील संपर्क कार्यालय प्रेयन्त कार्यकर्तेच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदार संजय शिरसाट यांचे जागोजागी सत्कार करण्यात आले.

पन्नास आमदारांनी उठाव केला, तो पैशांसाठी नक्कीच नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण भाजपसोबतच गेले पाहिजे असे सर्व आमदारांना वाटत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भोवतालची चांडाळ चौकडी दिशाभूल करुन शिवसेनेला मूळ विचारांपासून दूर घेऊन जात होती, आपल्याच आमदारांचे खच्चीकरण करत होती, म्हणून हा उठाव झाला, असा दावा बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी बुधवारी औरंगाबादेत केला. संजय राऊत सारखा माणूस शिवसेना डुबवायला निघाला आहे. या चांडाळ चौकडीला आठ दिवस मातोश्रीची दारे बंद करावी, ती आपोआप गुदमरुन मरेल, असेही शिरसाट म्हणाले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे बुधवारी सायंकाळी औरंगाबादेत परतले. यावेळी त्यांचे विमानतळापासून कोकणवाडी येथील कार्यालयापर्यंत जागोजागी जोरदार स्वागत करण्यात आले. संपर्क कार्यालयात पोहचल्यानंतर शिरसाट यांनी बंडामागील कारणे आणि पुढील वाटचाल याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. शिरसाट म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेले नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आम्ही केले ते बंड नव्हते तर तो उठाव होता. या उठावाची दखल जगातील ३३ देशात घेतली गेली. आमदारांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून खदखद होती. ती अखेर बाहेर आली. संजय राऊत आणि इतरांची चांडाळ चौकडी शिवसेनेला मूळ विचारांपासून दूर घेऊन जात होती. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला. राऊत सारखा माणूस दररोज उठतो, पत्रकार परिषद घेतो, काय अॅक्शन करतो, तो शिवसेना डुबवायला निघाला आहे. उठाव केलेल्या आमदारांविषयीही त्यांनी वाईट शब्द वापरले. अगदी वेश्या असेही संबोधले. त्यात महिला आमदारही होत्या. त्या जागी त्यांच्या घरातील महिला असती तर राऊत यांनी तसे शब्द वापरले असते का, असा सवालही शिरसाट यांनी केला.
पालकमंत्र्यांवरही साधला निशाणा

शिरसाट यांनी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. मी स्थानिकचा आमदार आहे. परंतु अडीच वर्षात देसाई यांचा मला एकदाही फोन आला नाही. कोणते कामही केले नाही. नियोजन समितीतून मला फक्त एक कोटीचा निधी मिळतो आणि बाजूच्याच गंगापूरला ११ कोटी. माझ्या घराच्या बाजूला कार्यक्रम घेतला, पण मला त्याची माहितीही दिली नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी देसाई यांच्याबद्दलची नाराजीही बोलून दाखविली.
दलालांनी आम्हाला अक्कल शिकवू नये

स्थानिक नेत्यांवरही शिरसाट यांनी कठोर शब्दात टीका केली. आमच्यावर विकले गेल्याचे आरोप केले जात आहेत. पण आम्ही विकासाचे राजकारण करतो. तेच आम्हाला कळते. नव्याने आमदार झालेल्यांना काही जणांना वाटते आम्हालाच सगळे कळते. पण त्यांना मी सांगतो आम्ही त्यांच्यासारखा घर भरण्याचा धंदा करत नाही. दलाली करत नाही. विकासाचे राजकारण करतो. दलालांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, असे शिरसाट म्हणाले.

यावेळी नगरसेवक सिंध्दात शिरसाट, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, नगरसेवक शिल्पाराणी वाडकर, गजानन बारवाल, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, राजू राजपूत, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, विभागप्रमुख मंगेश जाधव, रणजित ढेपे, संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, शिवाजी हिवाळे, रामेश्वर पेंढारे, मनोज सोनवणे, राजेश जंगले, सचिन राठोड, अनिल बिरारे, विजय पैठणे, गुडू बसणीवाल, विनोद बनकर, अमर सभादिंडी, श्रीकांत साळे, महेश भोंडवे, गणेश भोंडवे, संतोष नरवडे, सचिन गरड, विशाल खंडागळे, अरुण हिवाळे, संदीप आरके, गणेश जाधव, राजन गरबडे, निलेश नरवडे, राम पाटोळे, शेखर जाधव, राजेश कसुरे, ज्योतिराम पाटील, सागर वाघचौरे, कैलास भोकरे, रमाकांत भांगे, पोपटराव हांडे, विकी साळवे, नंदू चौथमल, सचिन शिंदे, सचिन वाहूळकर, बंटी सोनवणे, विकी पाटील, गजानन पाटील, संदीप डेव्हरे, धीरज बारवाल, मनदीप राजपूत, लखन दळवी, राजू लिंगे, सतीश जाधव आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न