ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटल व प्रसिध्द मेंदूविकारतज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनतर्फे डायमंड पुरस्कार व पक्षाघात रुग्णांसाठी हेल्पलाईन क्रमांकांचे अनावरण...!
ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटल व प्रसिध्द मेंदूविकारतज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनतर्फे डायमंड पुरस्कार व पक्षाघात रुग्णांसाठी हेल्पलाईन क्रमांकांचे अनावरण...!
औरंगाबादमधील ओरिऑन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व प्रसिध्द मेंदुविकारतज्या डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायजेशनतर्फे डायमंड पुरस्कार
देऊन गौरवण्यात आले आहे. डॉ. वट्टमवार हे औरंगाबादेतील ओरिऑन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथील मेंदुविकार विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
पक्षाघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवनवीन पद्धती आणि शैलींचा अवलंब करणान्या डॉक्टरांना संघटनेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
पक्षाघात हे जगभरातील मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. या आजारात केवळ रुग्णांवर नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. काळाबरोबर
आता उपचारांमध्ये झालेली प्रगती आणि अद्ययावत तंत्र यांमुळे रुग्णांचा बरे होण्याचा दर्जा उंचावला आहे. ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटलमधील मेंदूरोग विभाग पक्षाघाताच्या रुग्णांना तातडीने अद्ययावत उपचार देण्याकडे आणि बरे झाल्यानंतर त्यांना चांगले जीवनमान देण्याबाबत नेहमीच प्रयत्नशील असते. हा पुरस्कार ओरिऑन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ. पांडुरंग वट्टमवार यांना मराठवाड्यातील एकमेव उत्तम मेंदूरोगविभाग व मेंदूरोगतज्ञ म्हणुन सन्मानित केले आहे. जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशनकडून ब्रेन स्ट्रोक मॅनेजमेंटसाठी डायमंड पुरस्काराचा दर्जा मिळणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. हे यश ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटलसाठी तसेच
मराठवाड्यासाठी मोलाची बाब ठरली आहे. डॉ. पांडुरंग वट्टमवार रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी अथक प्रयत्नशील असतात. सदरील डायमंड पुरस्कार हा डॉ. वट्टमवार यांच्या सातत्यपूर्ण व आधुनिक कौशल्यांच्या दर्जामुळेच प्राप्त होऊ शकला आहे. डॉ. पांडुरंग वट्टमवार स्ट्रोकचे परिणाम सुधारण्यासाठी वचनबध्द आहे. पक्षाघाताचे सर्वसमावेशक व्यवस्थापन डॉ. वट्टमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ओरिऑन सिटीकेअर हॉस्पिटल येथे मेंदूरोगविभागात होते. समाजातील पक्षाघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंध उपचार आणि जागृकता यामध्ये सतत सुधारणा करण्याचे ध्येय डॉ. वट्टमवार यांचे आहे. डॉ. पांडुरंग वट्टमवार यांच्या न्युरोविभागाच्या या अत्याधुनिक सुविधांमुळे पक्षाघातांच्या रुग्णांसाठी ओरिऑन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे मराठवाड्यातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक ठरले आहे.
पक्षाघातामध्ये Save Minute Save Life प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो ज्यामध्ये आपण कित्येक रुग्णांचे आयुष्य वाचवु शकतो. एखाद्या व्यक्तिला पक्षाघाताचा अॅटक आला तर मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी पडल्यानंतर प्रत्येक क्षणाला मेंदूच्या लाखो पेशी मृत होत असतात. अश्या वेळेस प्रत्येक क्षण खुप महत्त्वाचा असतो. म्हणून पक्षाघाताची लक्षणे आढळताच त्वरीत उपचार करणे, किती गरजेचे असते याबद्दल जागृकता करून पक्षाघाताचा झटका आलेल्या रुग्णांसाठी ओरिऑन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने नुकताच ब्रेन स्ट्रोकच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास तत्पर हेल्पलाईन ACUTE STROKE HELPLINE NO-18005999100 क्रमांकाचे अनावरण केले आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तिला स्ट्रोकचा झटका येतो तेव्हा नातेवाईकांनी दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर तात्काळ फोन केला असता.. नातेवाईकाला योग्य ते मार्गदर्शन करून
रुग्णाला प्राथमिक उपचार ( रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यासाठीचे इंजेक्शन दिले जाते कारण स्ट्रोक हा २-३ तासानंतर अति तिव्र स्वरूपाचा होतो.) देवुन नजीकच्या
मेंदूरोग विभागात रुग्ण लवकरात लवकर कसा पोहोचेल याची संपूर्ण व्यवस्था या उपक्रमातुन केली जाईल. ही संकल्पना म्हणजे आयुष्य वाचविणेच नव्हे तर जीवनाची
गुणवत्ता वाढविणे आहे.
ACUTE STROKE HELPLINE Number: 18005999100