' मेडिकव्हर हॉस्पिटल औरंगाबाद येथे कमी वजनाच्या नवजात शिशु ला मिळाले नवजीवन ''
'' मेडिकव्हर हॉस्पिटल औरंगाबाद येथे कमी वजनाच्या नवजात शिशु ला मिळाले नवजीवन ''
औरंगाबाद : मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे परभणी येथून एक दांपत्य डिलेव्हरी साठी तात्काळ आणि अटी जोखमीच्या प्रसूतीसाठी आले, आई चा बीपी वाढलेला होता . आई वजन देखील कमी होते , अशावेळी त्यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे दाखवले आणि डॉ .चंद्रशेखर चव्हान (स्त्री रोग तज्ञ) डॉ . जयश्री मोरे( स्त्री रोग तज्ञ) यांनी सगळ्या तपासण्या करून डिलेव्हरी करण्याचा निर्णय घेतला पण बाळालाच वजन खूप कमी असल्यामुळे देखील सांगितले . आईचे प्राण वाचवण्यासाठी हे अती आवश्यक होते.
डिलेव्हरी झाली . आणि नंतर डॉ राहुल गोसावी( नवजात शिशु तज्ञ व बाळ रोग तज्ञ ) यांच्या समोर १ किलोच्या बाळाचं वजन वाढवणे व त्याला सुखरूप आई वडिलांना देणे हे आव्हान होते . बाळाला जवळ जवळ 15 दिवस नवजात शिशु अतिदक्षता विभागात तर नंतर 20 दिवस आईच्या जवळ कांगारू मदर कक्षात ठेवण्यात आले. यादरम्यान बाळाची वाढ ही फक्त आईच्या दुधावर झाली.
फक्त आई च्या दुधावर त्या बाळाचं वजन वाढवले व त्याला लागणाऱ्या सगळ्या उपचार दिले व ते बाळ आज २किलो चा जवळपास त्याचे वजन झाले आहे . या जागतिक स्तनपान सप्ताह मध्ये स्तनपानाचे आणि आईच्या दुधाचे महत्त्व सांगणारी गोष्ट यापेक्षा दुसरी अजून कोणती असू शकते. बाळाच्या आई वडिलांनी डॉक्टर व मेडिकव्हर हॉस्पिटल्स चे आभार मानले .
याच अनुशंगाने च मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला आई च दूध बाळासाठी किती आवश्यक आहे या साठी विविध कार्यक्रम व मार्गदर्शन करण्यात आले. गरोदरपणात,बाळंत झाल्यानंतर आईच्या मनात स्तनपानाविषयी अनेक प्रश्न येत असतात.आपण बाळाला दूध योग्य पद्धतीने पाजू शकू का? बाळाला पुरेसे दूध मिळेल का? स्तनपानामुळे आपले शरीर बेढब तर दिसणार नाही ना? स्तनपान करत असताना आपण नोकरी, व्यवसायाला सुरुवात कशी करणार? असे अनेक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासोबत येते गैरसमजूतींची एक मोठी यादी.होती .. यावर मार्गदर्शन डॉ जयश्री मोरे, डॉ चंद्रशेखर चव्हाण डॉ राहुल गोसावी यांनी केले.
मेडिकव्हर हॉस्पिटल्स येथे एकाच छताखाली नवजात शिशुसाठी व लहान मुलांसाठी अत्याधुनिक व सुसज्य अतिदक्षता विभाग व आंतररुग्ण विभाग बालकांसाठी सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सेवा व डॉ राहुल गोसावी( नवजात शिशु तज्ञ व बाल रोग तज्ञ ) ,२४ तास अत्यावश्यक सेवा व्हेंटिलेटर सुविधा , बाल शस्त्रक्रिया सुविधा , २४ तास लहान मुलांसाठी बाह्यरुग्ण विभाग औरंगाबाद येथे मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये उपलब्ध आहेत, तसेच अती जोखमीच्या डिलिव्हरी साठी तज्ञ डॉ जयश्री मोरे व डॉ चंद्रशेखर चव्हाण पूर्ण वेळ उपलब्ध आहेत. आता औरंगाबाद व मराठवाड्यातील लोकांना पुणे किंवा मुबंई येथे जाण्याची आवश्यकता नाही अशी माहिती मेडिकव्हर च्या केंद्र प्रमुख डॉ . नेहा जैन यांनी दिली . व या यशा बदल डॉ. राहुल गोसावी व त्यांच्या टीम च अभिनंदन केले .
.