हमदर्द ट्रस्ट औरंगाबाद तर्फ़े भव्य पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन,मैलाना अबुल कलाम आजाद रिसर्च सेंटर .
हमदर्द ट्रस्ट औरंगाबाद च्या वतिने भव्य पुरस्कार वितरण सोहळा चा आयोजन.
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद शहराचे स्वतःचे वेगळेपण आहे ज्ञान आणि साहित्याच्या आकाशातही या शहराची स्वतःची एक आकाश गंगा आहे अनेक तरुणांनी आपल्या परिश्रमाने हे यश संपादन केले आहे संघर्ष आणि परिश्रमाने शहराला गगनाला भिडले आहे. पण आज आपण अशा व्यक्तींना विसरलो आहोत ज्यांनी समाजासाठी आपली सेवा दिली आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पराक्रम गाजवला, मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो मग ते शिक्षण क्षेत्र असो की धर्माचे, या लोकांना त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे असे कधीच वाटले नाही, तर ते निःस्वार्थपणे आपल्या देश आणि राष्ट्राच्या सेवेत गुंतले होते. आपली जबाबदारी आहे की ज्यांनी आपल्या राष्ट्राला उच्च स्थानावर नेण्यासाठी जे जे काही केले, त्यांना आपण विसरता कामा नये, तर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या सेवांचे स्मरण करून भावी पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा.याच उद्देशाअंतर्गत औरंगाबाद शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणारे
दिवंगत डॉ. मजहर मोहिउद्दीन यांच्या नावाने मराठवाडा स्तरावरील पुरस्कार देण्याचा निर्णय हमदर्द ट्रस्टने घेतला आहे. उर्दू मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना हा
पुरस्कार दिला जाणार आहे. त्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा समावेश असेल यासोबतच औरंगाबादमध्ये पहिले उर्दू वृत्तपत्र सुरू करण्याचे श्रेय दिवंगत अज़ीज़ खुसरो यांना जाते. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भय आणि निःपक्ष पत्रकारिता करनारीयांना दिवंगत अज़ीज़ खुसरो यांच्या नावाने "अजीज खुसरो हमदर्द मराठवाडा आदर्श पत्रकार पुरस्कार देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
नवीन औरंगाबादचे शिल्पकार डॉ. रफिक झकेरिया यांची सेवाही अविस्मरणीय आहे.म्हणूनच त्यांच्या नावाने निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्यांना "डॉ. रफिक झकेरिया हमदर्द
मराठवाडा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहर निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना "कर्नल सय्यद मोहम्मद
दरवीश नेहरी हमदर्द आदर्श समाजसेवा पुरस्कार देण्याचे नियोजन आहे.
याशिवाय अनेकांनी सहितेत काम केले आहे. याशिवाय अनेक लोकांनी कोविड 19 मध्ये काम केले
असून त्यापैकी दोन जणांना पुरस्कार देण्यात येत आहे.
हे सर्व पुरस्कार 28/ऑगस्ट 2022 रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल
येथे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील.
या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ. फौजिया तहसीन खान, माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, आमदार सतीश चौहान, जिल्हाधिकारी सुनील चौहान, एमएसईटीसीएलचे प्रकल्प संचालक सय्यद नसीर कादरी, डीन शालेय शिक्षण मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ हैदराबादचे प्राध्यापक मुहम्मद महमूद सिद्दीकी, अध्यक्ष केंद्रीय शैक्षणिक मंडळ जमात-ए-इस्लामी हिंद दिल्ली मुजतबा फारुक, अमीर वाहदत-ए-इस्लामी हिंद दिल्ली झियाउद्दीन सिद्दीकी, औरंगाबाद टाईम्सचे मुख्य संपादक
शोएब खुसरो, एशिया एक्सप्रेसचे मुख्य संपादक शारिक नक्शबंदी, शमा रहबरचे मुख्य संपादक जमीर अहेमद कादरी, हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य संपादक नायब अन्सारी आणि अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कथा लेखक व समीक्षक श्री. नूरुल हसनैन उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत.