पर्युषण पर्वात होणार महाआरती नृत्य स्पर्धा आणि अनुव्रत संस्कार महामहोत्सव भगवान शांतीनाथाचा पंचामृत अभिषेक

पर्युषण पर्वत होणार महाआरती नृत्य स्पर्धा आणि अनुव्रत संस्कार महामहोत्सव भगवान शांतीनाथाचा पंचामृत अभिषेक
औरंगाबाद- यावर्षी भारत गौरव राष्ट्रसंत आचार्य पुलक सागर यांच्या उपस्थितीत पर्युषण पर्व मोठ्या
उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे होत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्यांदा पर्युषण
पर्वात श्रीमद जिनेंद्र महाआरती नृत्य स्पर्धा आणि अनुव्रत संस्कार महामहोत्सव होणार आहे, अशी माहिती
श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत आणि पूलकमंच परिवारातर्फे देण्यात आली.
आयोजकांनी सांगितले की, औरंगाबाद चा इतिहासात पहिल्यांदा राज्यस्तरीय महाआरती नृत्य
स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्यास अनुक्रमे ३१
हजार, एकवीस हजार आणि ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी मुख्य
प्रायोजक म्हणुन श्रीमान अश्श्विनकुमार, पिरजकुमार, सुधाकरसा साहुजी, सौ. करुणा विलास साहुजी, सौ. प्रिया
जितेंद्र अग्रवाल तर सहप्रायोजक म्हणून सौ. उर्मिला प्रमोदकुमार ठोलीया, श्री. तुषार प्रदिपकुमार पहाडे नमोकार
सुपर मार्ट (वनड), श्री. अजित जैन रवी मसाले आणि यांचे सहकार्य लाभले
आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे नियम याप्रमाणे आहेत. आरतीचा वेळ पाच मिनिटे असेल. आरती दरम्यान
केलेली ड्रेसिंग, आरती सजावट आणि नृत्य यासाठी मार्क असतील. आरती करताना दिवा असणे आवश्यक
आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय १५ ते ४० वर्षे असावे. या स्पर्धेत महिला अथवा पुरुष दोन्ही
सहभागी होऊ शकतात. एका रूप मध्ये किमान सहा ते दहा लोक असणे आवश्यक आहे. पहिल्या वीस
पला प्राधान्य दिले आईल. स्पर्धेचे सगळे अधिकार आयोजकांना असेल. स्पर्धेच्या वेळी आरती वेळेवर सुरू
झाली नाही तर तो ग्रुप स्पर्धेतून बाद होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. हा संपूर्ण कार्यक्रम
श्री. हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगण येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख सुमित ठोळे, अभिजीत पाटणी, संजय सिंघही, अक्षय पाटणी सुप्रम जैन
कविता अजमेरा आणि सुमित पाटणी हे आहेत.
अनुव्रत संस्कार महामहोत्सव
३१ ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दरम्यान होणाया या महामहोत्सवात सकाळी ५.३० वाजता प्राणायम
व ध्यान, ६.३० ते ८ वा. भगवंताचा अभिषेक व पुजन, ८ ते ८.४५ वा. आचार्यश्रीचे प्रवचन, ९ ते १०
वा. राजावजार जैन मंदिरात णमोकार भक्ती मंडळाच्या सानिध्यात संगीतमय भगवान शांतीनाथांचा पंचामृत
अभिषेक, १० वा. एकासन साधना, १२ ते १ वा. सामाईक मंत्र जाप, दुपारी २ वा. धार्मिक प्रशिक्षक, शंका
समाधान, तत्व चर्चा, ६ वा. भक्तांवर आराधना गुरुभक्ती महाआरती ७.३० वाजेपासुन सांस्कृतीक कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, चातुर्मास समिती आणि
पूलकमंच परिवार, पुलकमंच महिला मंडळ च्या वतीने पंचायत में चातुर्मास अध्यक्ष ललीत पाटणी, कार्याध्यक्ष
महावीर पाटणी, चातुर्मास मंत्री प्रकाश अजमेरा, संरक्षक सुनिल काला यांच्यासह पुलक मंच शहर शाखेचे
अध्यक्ष सुचित बाकलीवाल, महामंत्री सागर पाटणी,
उपाध्यक्ष प्रदेश पांडे, उपमहामंत्री अमित पहाडे, राजावजार
शाखा अध्यक्ष दिलीप कासलीवाल, महामंत्री शांतीलाल पाटणी,
प्रसाद पाटणी, महिला राजाबजार शाखा अध्यक्षा
कांताबाई पहाडे, महामंत्री निता ठोले, हडको शाखा अध्यक्ष किरण पांडे, महामंत्री ज्योती पाटणी, अरिहंतनगर
शाखा अध्यक्षा सिमा पाटणी,
महामंत्री सपना पापडीवाल, सिडको शाखा अध्यक्षा रश्मी पाटणी, महामंत्री
मोनिका पाटणी यांच्यासह पुलक मंच शाखा प्रयत्न करीत आहे.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न