गरजूंना मदत करत समाजसेवक इब्राहिम पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
गरजूंना मदत करत समाजसेवक इब्राहिम पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
औरंगाबाद,:- नेहमी जनतेच्या सेवेत तत्पर असलेले किराडपुरा येथील माजी नगरसेवक तथा समाजसेवक इब्राहिम पटेल यांचा वाढदिवस आज त्यांच्या समर्थकांनी गरजुंना कपडे व फळ वाटप करुन साजरा केला. किराडपुरा येथील संपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळपासून शहरातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. रहेमानिया काँलनी, किराडपुरा, अल्तमश काँलनी, शरीफ काँलनी, रोशनगेट येथील कार्यकर्त्यांनी सुध्दा त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख उपस्थिती तकी हसन खान, हाजी इसाक खान, हाजी निसार पटेल, ताहेर पटेल, शफी मौलाना, रफीक पटेल, इस्माईल,पटेल,आरेफ शेख ,सरनवाज अन्सारी, शाकेर पटेल, जाकेर पटेल, बिस्मीलाह खान,सदफ, शहेबाज आदी उपस्थित होते.