वाल्मिक समाजाचे वर्ष २०१० ते २०२२ (NSKFDC) चे कर्जाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे व वाल्मिक समाजाचे कर्ज मंजुर करणे लाभार्थ्यांना न्याय साठी भारतीय बहुजन कामगार संघचे वीभागीय अध्यक्ष राजेंद्र पोहालचे आमरण उपोषण
वाल्मिक समाजाचे वर्ष २०१० ते २०२२ (NSKFDC) चे कर्जाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे व वाल्मिक समाजाचे कर्ज मंजुर करणे लाभार्थ्यांना न्याय साठी भारतीय बहुजन कामगार संघचे वीभागीय अध्यक्ष राजेंद्र पोहालचे आमरण उपोषण
औरंगाबाद : समाजातील दुर्बल घटक विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच वाल्मिकी समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असून सर्व समाजातील आर्थिक दुर्बल घटकांची आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटूंबांचे आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून आणण्याचे मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची कंपनी कायदा अतिधनियम १९५६ अन्वये १० जुलै १९७८ रोजी स्थापना केली आहे. महामंडळामार्फत अनुसूचित जाती व वाल्मिकी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत जीवन जगणाऱ्या व्यक्तिंना अस्वच्छ सफाई कामगारांच्या अशिक्षीतांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनेतंर्गंत स्वयंरोजगारांसाठी आर्थिक योजना तसेच प्रशिक्षण देणे महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
१) कर्ज अनुदान योजना २) वीज भांडवल, ३) प्रशिक्षण
योजना ४) राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, (NSKFDC) नॅशनल सफाई
कर्मचारी फायनन्सर अॅण्ड डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन (A Government of India Undertaking
Under Ministrey of Social Justice and Impowerment) आपल्या कार्यकाळात वाल्मिक समाजावर अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी आपल्या निदर्शनास आणून देणे हे आमचे कर्तव्य आहे. आपली प्रतिमा मलिन होऊ नये, त्यासाठी आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
वाल्मिक समाजाचे कर्ज प्रकरण २०१० ते २०२२ पर्यंत जे प्रलबिंत प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यात यावे. आजतागायत मागच्या सहा महिन्यापासून जे कर्जप्रकरण बाकी होते. त्याच्यातून ३७० लाभार्थी यांच्या खात्यावर आपण रक्कम पाठविली. त्या ३७० लाभार्थ्यांमध्ये वाल्मिक समाजाचे फक्त ०८ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम आलेली आहे. आता वाल्मिक समाजावर हे अन्याय आपल्याकडून
होत आहेत की, आपल्या जिल्हा व्यवस्थापक किंवा त्यांचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून
होते आहे. याची चौकशी करुन त्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
तसेच दिनांक ०२/०८/२०२२ च्या दिनांक १०/०८/२०२२ अगोदर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर दिनांक ११/०८/२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वाल्मिक समाजाचे लाभार्थी औरंगाबाद ते
मुंबई सायकलवर येऊन मा. मुख्यमंत्री साहेब तसेच मा.उपमुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देवू.
प्रमुख मागण्या :
१. एन.एस.के.एफ.डी.सी. चे कर्जाचे प्रकरण वर्ष २०१० ते वर्ष २०२२ या काळात वाल्मिक समाजाचे किती प्रकरण मार्गी लागले याची लेखी माहिती देणे.
२. इतर समाजातील महामंडळ स्थापित करण्यात आलेले आहे तसेच वाल्मिकी समाजासाठी
वेगळे महामंडळ स्थापित करण्यात यावे.
३. लाभार्थी निवड समितीच्या मिटिंगमध्ये मंजूरी नसताना यांनी कर्ज प्रकरणे प्रादेशिक
कार्यालय व मुंबईला पाठविले आहेत याची चौकशी करण्यात यावी.
४. एन.एस.के.एफ.डी.सी. चे प्रकरण ५ लाख व १० लाख तसेच १५ लाख मागच्या ८ महिन्यात शिंदे साहेबांच्या कार्यकाळात किती व कोणत्या समाजाचे काम करण्यात आले व लाभार्थी यांची लेखी माहिती देणे.