जय संघर्ष वाहन चालक,मालक संघटना तर्फ़े विभागीय अयुक्त मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ला वाहन चालकांचे विविध मागनीचे निवेदन दिले.

जय संघर्ष वाहन चालक,मालक संघटना तर्फ़े विभागीय अयुक्त मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ला वाहन चालकांचे विविध मागनीचे निवेदन दिले. 

प्रमुख मागनीया 
1) वाहन चालकांना खाजगी फायनास कंपनीच्या वसुली पथकांच्या कर्मचार्यां कडून,टोल कर्मचार्यां कडून,भुरट्या चोरा कडून, पोलीस कर्मचार्या कडून होणार्या मारहाणीला आळा घालण्यात यावा.
2) क्रुझर, तवेरा, इनोव्हा, स्कार्पियो, इर्टिगा, व्हिंगर या पीवळ्या पाटिच्या वाहनांसाठी प्रवासी क्षमता वाढवून देण्यात यावी. 
3) ऑन लाइन चालान देणे बंद करण्यात यावे.पोलीसांची स्पीड गन वाहन हायवे वरूण हटवण्यात यावे आणि  टोल नाक्यावर उभे राहून वाहनांची पोलींसा करवी करण्यात येणारी पेपर तपासणी बंद करण्यात यावी.
4)राज्यातील प्रत्येक धार्मीक स्थळी व पर्यन्त स्थली तसेंच हायवे वरील  प्रत्येक पेट्रोल पंपावर  चालकांच्या विश्रांतीची सोय करण्यात यावी.
5)वाहन चालकांसाठीच्या घोषीत कल्याणकारी महामंडळाची अमबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी.
6) वाहन चालक गंभीर जख्मी अथवा कायम स्वरूपी 50 ते 100 टक्के अपंगत्व आल्यास  वा मृत्युमुखी पडल्यास त्याच्या परिवारास तात्काळ सरकारच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी.
7) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजना कार्यान्वीत करूण 30 हजार रूपया वरूण 1 लाख रूपये करण्यात यावेत.
8) गेली अनेक वर्षा पासून मीटर रिक्षाची न झालेली दरवाढ 15 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात यावी.
9) वाहन चालकांच्या पाल्यांसाठी विभागवार स्वतंत्र होस्टेलची सोय करण्यात यावी.

वरील मागण्यांची सरकारच्या वतीने 15 सप्टेंबर2022 पर्यंत दखल घेण्यात यावी अन्यथा दि.16 व दि.17 सप्टेंबर आसे सलग दोन दिवस विभागीय आयुक्त कार्यलय औरंगाबाद समोर ठिय्या‌ आंदोलन केले जाईल आशा आशयाचे निवेदन आज दि.01/09/2022 रोजी विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेबांना देण्यात आले.
निवेदनावर जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक,चालक मालक संघटनेचे 1)संस्थापक अध्यक श्री संजय हाळनोर,2)जय संघर्ष संस्थेचे उपाध्यक्ष श्री संतोष काळवणे,3)जय संघर्ष संघटनेचे उपाध्यक्ष श्री सोमनाथ गायकवाड,4)सचिव श्री निखिल कुलकर्णी,5) कार्याध्यक्ष श्री लक्ष्मण शेंडगे,6)सहसंघटक श्री अब्बासभाई पठाण,7)सोशल मिडिया‌ प्रमुख श्री सागरसिंग राजपूत,8)मिडिया प्रसिद्धि प्रमुख श्री रविंद्र सुरडकर तसेच 9)जय संघर्ष संस्थेचे औरंगाबाद जि.अध्यक्ष रिक्षा विभाग श्री लक्ष्मण सोनवणे,10)प्रवासी वाहतूक औरंगाबाद जि.अध्यक्ष श्री लक्ष्मण वाघ बाबरेकर,11)औरंगाबाद जि.सचिव श्री संजय नरवडे,12) सदस्य श्री कल्याण औताडे,13) अनिल मते 14) अशोक तिवारी 15)अमोल तावरे उपस्थीत होते.
तसेच 16)औरंगाबाद संघर्ष कृती समितीचे शेख सरवर कँप्टन,17)श्री मनोज जैस्वाल,18)खाँजा खान 19)नजिरभाई यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न