पुरस्काराच्या रकमेतून सुरू केले मनपा हर्सूलगाव शाळेत श्याम देशपांडे बाल वाचनालय,मनपा हर्सूलगाव शाळेस श्याम देशपांडे बाल वाचनालय भेट

**पुरस्काराच्या रकमेतून सुरू केले मनपा हर्सूलगाव शाळेस श्याम देशपांडे बाल वाचनालय*

*मनपा हर्सूलगाव शाळेस श्याम देशपांडे बाल वाचनालय भेट*
औरंगाबाद 10 
आज मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सूल गाव शाळेत रिड अँड लिड फाउंडेशन औरंगाबाद द्वारा मिशन मरयम मिर्झा मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय अभियानांतर्गत श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ 29 वे श्याम देशपांडे बाल वाचनालयाचे उद्घाटन प्रसिद्ध  उद्योजक नमस्ते लेखक माननीय गिरीश मगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ राजहंस प्रकाशन आणि संडे क्लब च्या वतिने *"श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार* प्रथम पुरस्कार रिड अँड लिड  फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय मिर्झा अब्दुल कय्युम नदवी  यांना जाहीर झाला होता.
 या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे होते. या रकमेतून त्यांनी मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शाळेस श्याम देशपांडे बाल  वाचनालयासाठी एक अलमारी व दोनशे पुस्तके भेट दिली. 
*Save Money Read Books* ह्या उपक्रमा अंर्तगत 
 मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी दोनशे विद्यार्थ्यांना गल्ले वाटप करण्यात आले. या गल्ल्यातून जमा होणाऱ्या रकमेतून पुस्तके खरेदी करून एका महिन्यानंतर शाळेतच पुस्तक प्रदर्शन भरवले जाणार आहे.

*11 सप्टेंबर हा श्याम देशपांडे चा जन्मदिन. रविवार असल्या मुले 10 सप्टेंबर ला उदघाटन करन्यात आले*
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय लोहार मॅडम प्रमुख पाहुणे श्रीमती शुभांगी देशपांडे ,अपूर्व, माधुरी देशपांडे उपस्थित होते रिड ॲंड  लिड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम याचे मोलाचं योगदान दिले. कार्यक्रम प्रसंगी लोहार मॅडम, गिरीश मगरे, मिर्झा अब्दुल कय्युम, शिक्षक अंकुश लाडके, अपूर्व देशपांडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरंगळीकर मॅडम यांनी केले तर आभार वैष्णव मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न