मानवतेचा संदेश" नौशाद उस्मान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाले

"मानवतेचा संदेश" नौशाद उस्मान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाले
इस्लाम धर्मात सांगण्यात आलेला मानवतेचा विस्तीर्ण दृष्टीकोण धार्मिक व सामाजिक सुधारणा वाढवण्याच्या
उद्देशाने एस. आय. ओ व दैनिक सकाळ च्या वतीने 2019 मध्ये नौशाद उस्मान यांचे विशेष लेख दैनिकात प्रकाशित
झाले होते, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले हे लेख संकलन करून हे लेख समूह "मानवतेचा संदेश" नावाने पुस्तक
प्रकाशित करण्यात आले.
पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात लेखक व माजी रजिस्टार शेषराज चव्हाण साहेबांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर इक्बाल मिन्ने (प्रख्यात रेडिओलॉजिस्ट), इंजिनीयर अब्दुल कादरी( शहराध्यक्ष जे.
आय. एच औरंगाबाद), दयानंद माने ( संपादक सकाळ), संजय चिकटे (मॅनेजर सकाळ), सलमान खान ( प्रदेशाध्यक्ष
एस. आय. ओ. दक्षिण महाराष्ट्र), आणि पुस्तकाचे लेखक नौशाद उस्मान उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष एस. आय. ओ
सलमान खान यांनी कार्यक्रमाची प्रासंगिकता केली व लोकप्रिय झालेले लेख एकत्रित करून त्यांची
प्रकाशित करण्याची नितांत गरज होती असे संबोधले.
पुस्तक
.
उस्मान म्हणाले, इस्लाम हे जीवन जगण्याची प्रणाली आहे आणि मानवाला नैसर्गिक रित्या आत्मसात होणारी
जीवन पद्धत आहे. व त्याची शिकवण एका विशिष्ट धर्म लोकांपर्यंत मर्यादित नसून संपूर्ण सृष्टी साठी आहे, म्हणून
इस्लाम च्या शिकवणी समजून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे. अध्यक्षीय भाषणात सन्माननीय वाजीत कादरी
साहेबांनी देशातील सद्यस्थिती धार्मिक असहिष्णुता, समाजातील विविध घटकांमधील वाढलेला अंतर याबद्दल
चिंता व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लाम बद्दल द्वेषाचा प्रसार केला जात आहे, या सर्वाना
उत्तर प्रेमाने परीसंवादाने, "मानवतेचा संदेश "यासारखे पुस्तक लोकांपर्यंत पोहचवून केला पाहिजे असे प्रतिपादन
त्यांनी केले. प्रमुख पाहुणे शेषराव चव्हाण साहेबांनी या पुस्तकाची स्तुती केली व श्रोत्यांना पुस्तक वाचण्याच्या
आव्हान केले. तसेच इतर व त्यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे शेवटी एस. आय. ओ चे जनसंपर्क सचिव
आसिफ कुरेशी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न