प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांना समाजभुषण पुरस्कार जाहिर करण्यात आले

प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांना समाजभुषण पुरस्कार जाहिर करण्यात आले
औरंगाबाद येथील डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर शिक्षणप्रसारक मंडळचे संथापक अध्यक्ष आणि मातोश्री डॉ. कंचन शांतिलालजी देसरडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांना निळे प्रतिक बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिलेजाणारे समाजभुषण पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.

निळे प्रतिक बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष संपादक रतन कुमार साळवे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. की, प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांनी शैक्षणिक, सामाजिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या बहुमुल्य कार्याबदल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.

उदया १७ सप्टेंबर २०२२ रोजी मौलाना आझाद सभागृहात हे पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांनी आपल्या संस्थेमार्फत चार महाविद्यालये, एक शाळा, एक पॅथॉलॉजी लॅब चालवत असून, विद्यापीठवार्ताचे माजी संपादक व महाराष्ट्र जनशक्ती न्युज चे संचालक – संपादक आहेत. त्यांच्या या यशाबदल डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, डॉ. कंचन देसरडा, डॉ. योगेश देसरडा, डॉ. कोमल देसरडा, डॉ. रश्मी अभय कुचेरिया, संस्थेच्या सचिव प्रा. सय्यद शबाना शब्बीर, संस्थेचे कोषाध्यक्ष इरफान इनामदार, सय्यद अल्ताफ शब्बीर, काँग्रेसचे नेते राजेश मुंढे, प्राध्यापक संघटनेचे नेते डॉ. उमाकांत राठोड, उद्योगपती राजेश उघडे. नुतन राजपुत, शंतनु खांडे, डॉ. गोविंद वाघमारे, डॉ. गणेश राठेड, समाधान दहीवाळ, डॉ. दैवत सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न