जायंटस ग्रुप ऑफ औरंगाबाद च्या वतीने ३६ वे मोफत जयपुर फुट शिबीराचे दिनांक ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरमियान औरंगाबाद मध्ये आयोजीत करण्यात आले आहे.

औरंगाबाद जायंटस ग्रुप ऑफ औरंगाबाद च्या वतीने नेहमी सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. तसेच नेहमी प्रमाणे मोफत जयपुर
फुट शिबीराचे आयोजन करत असतात. जायंटस ग्रुप औरंगाबाद वतीने १९८५ ते २०१९ पर्यत दरवर्षी हे शिबीर आयोजीत करत होते. २०२० व २०२१ मध्ये कोरोना
महामारी मुळे हे शिबीर घेता आले नाही. याच अनुशंगाने सामाजिक कार्यात हातभार लावावा या हेतुने दिनांक ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत या शिबीराचे सिमंत मंगल कार्यालय येथे या शिबीराचे मोफत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जायंटस ग्रुप चे अध्यक्ष दिनेश गंगवाल, सचिव नरेंद्र पटेल, सहसचिव
शितल राजपुत, कोषाध्यक्ष विष्णु राऊत व जयपुर शिबीराचे संयोजक डॉ. रविंद्र झंवर यांनी दिली.
ज्याचे पाय गुडघ्याखाली व गुडघ्याच्या वर कापले गेले आहे अशांना या शिबीराचा लाभ घेता येणार आहे. यावेळी शिवरात येतांना आजाराची कागदपत्रे व सध्या वापरातील कृतीम पाय जयपुर फुट सोबत आणावा, दिनांक ११ सप्टेंबर
रविवार रोजी सिमंत मंगल कार्यालय येथे रुग्णांची तपासणी करण्यात येईल व त्यांना कृतीम पाय देण्यात येईल. या शिबीरासाठी औरंगाबाद शहरासह,कन्नड, अंबड, जालना, भोकरदन, लासुर, गंगापुर, पैठण, पाचोड आदी ठिकाणाहुन रुग्ण उपस्थित राहणार आहे. यावेळी जायंटस ग्रुप ऑफ औरंगाबाद तर्फे रुग्णांची व रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या शिबीरासाठी जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे सहकार्य मिळाले आहे. तरी सर्व स्तरातील बांधवांनी या ३६ वा मोफत जयपुर फुट शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जायंटस ग्रुप चे अध्यक्ष दिनेश गंगवाल, सचिव नरेंद्र पटेल,सहसचिव शितल राजपुत, कोषाध्यक्ष विष्णु राऊत व जयपुर शिबीराचे संयोजक
डॉ. रविंद्र झंवर यांच्यासह जायंटस ग्रुप चे सदस्य शिवनाथ राठी, सुभाष नायक, देवेंद्र सेठ, रामनारायण बंग, शंकरलाल पटेल, नितीन मेहता, सुनिल अजमेरा, गुरुदत्त राजपुत, सुर्युमाला मालाणी, डी. जी. चव्हाण, जे. के. ग्रोवर, पारस छाजेड, ओमप्रकाश काबरा यांच्यासह जायंटस ग्रुप ऑफ परिवार परिश्रम घेत आहे.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न