*शिक्षक सन्मान रॅलीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांमार्फत मागण्यांचे निवेदन शासनास माननीय आमदार व सहभागी शिक्षक संघटनेच्या हस्ते सादर...*

*शिक्षक सन्मान रॅलीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांमार्फत मागण्यांचे निवेदन शासनास माननीय आमदार व सहभागी शिक्षक संघटनेच्या हस्ते सादर...*

औरंगाबाद: शिक्षक व शिक्षण विरोधी प्रवृत्ती च्या विरुद्ध शिक्षकांच्या आत्मसन्मानाचे समर्थन आणि शिक्षण विषयक विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक ११सप्टेंबर रोजी शिक्षक भारती आणि इतर समविचारी संघटनांच्या वतीने एक भव्य शिक्षक सन्मान रॅली काढण्यात आली होती.
 त्या रॅलीचे नेतृत्व मुंबई विभाग शिक्षक आमदार मा. कपिल पाटील, मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार मा. विक्रम काळे, नाशिक विभाग पदवीधर आमदार मा. डॉ सुधीर तांबे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण
विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे (फोनवरून मार्गदर्शन) केले.रॅली चे विसर्जन झाल्यानंतर
खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
१)शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करा अथवा मुख्यालयी शासकीय निवासस्थाने बांधून द्यावी.

२)शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये.

३) सरकारी शाळांना भौतिक सुविधानी सुसज्ज करा.

४) सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष द्या.

५) शिक्षकांची RTE नुसार जी १८००० रिक्त पदे आहेत ती आणि इतर पर्यवेक्षकीय रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.

६)२००५ नंतर नियुक्त शिक्षकांनाही जुनी पेन्शन योजना लागू करा.

७) वस्तीशाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी चा लाभ द्यावा.
वरील मुद्यांचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय येथे संबंधितांना देण्यात आले.
यावेळी माननीय आमदार महोदय सोबतच शिक्षक भारतीचे सुभाष महेर सर, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटचे राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप विखे सर,  प्रकाश दाणे सर, उर्दू शिक्षक संघटना शेख मोईनुद्दीन सर, शिक्षक सेना, मुप्टा संघटना, जुनी पेन्शन संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न