औरंगाबाद शहरा जवळील रायपुर डोणगांव येथे शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांच्या हस्ते CC रोडचे उदघाटन.
औरंगाबाद शहरा जवळील रायपुर डोणगांव येथे शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांच्या हस्ते रस्त्याचे उदघाटन
.०८/०९/२०२२ रोजी रायपुर डोणगांव तालुका गंगापुर येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळाला जानारा रोड साठी आमदार राजेश राठोड यांच्या स्वच्छ निधीतुन दहा लाख रुपये मंज़ुर केले.सिमेंट काँकरेट रस्त्याचे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा येथे जाण्या येण्या करिता शिक्षक, विद्यार्थी व नागरीकांना रस्ता खराब असल्यामुळे जाण्या येण्यास त्रास होत असल्यामुळे आमदार राजेश राठोड यांनी रोड साठी स्वच्छ निधीतुन दहा लाख रुपये देऊन राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळाला येणा-या जाणा-या शिक्षक, विद्यार्थी व नागरीकांना दिलासा दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस डॉ.जफर अहेमद खान, डॉ.पवन डोंगरे, शेख अथर, अनिस पटेल, निलेश अंबेवाडीकर, राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा चे प्राचार्य निखील राठोड, डॉ.सुनिल सोळंकी, डॉ.दत्त्त पडधान, संजय देशमुख, आकाश रगडे, पंकज बोरकर, अमिन पठाण, जाकेर शेख व शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.