अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची स्काॅलर्शिप रद्द केल्याने समाजात संताप, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा...विभागीय आयुक्त यांना निवेदन
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची स्काॅलर्शिप रद्द केल्याने समाजात संताप, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा...
विभागीय आयुक्त यांना निवेदन
औरंगाबाद, (प्रतिनिधी)
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्काॅलर्शिप अचानक रद्द करण्यात आल्याने अल्पसंख्याक समाज तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने हि स्काॅलर्शिप विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर रद्द केल्याने आणखी राग पालक वर्गात व्यक्त केला जात आहे. सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये नाराजी आहे. जाणूनबुजून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्यासाठी असला निर्णय घेण्यात आला अशी भावना पालकवर्गात आहे. यामुळे राज्यातील लाखो तर देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला व रहीवाशी व लागणारी कागदपत्रे जोडून नियमानुसार ऑनलाईन अर्ज भरला आहे. हि स्काॅलर्शिप पुन्हा बहाल करण्यात यावी या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांचेमार्फत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांना पाठवले आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक विभागामार्फत दरवर्षी गरीब अल्पसंख्याक विद्यार्थी( शिख, जैन, बौद्ध, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन) यांना दिली जाते. या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्यात यावी नसता काही दिवसांत पालक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदन सादर करताना समाजसेवक साहेबखान पठाण, क्राईम इन्फाॅर्मेशन डिव्हिजनचे शेख रशीद रहेमान, राहुल भोटकर, एमडी तय्यब जफर, इरफान खान, सय्यद अहेमद, पंडीत वेलदोडे आदी उपस्थित होते. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असे निवेदनात म्हटले आहे.