सय्यद लईकोद्दीन सरपंचपदी विराजमान होवू शकतात...?स्वराज्य ग्राम विकास पैनलची प्रचारात आघाडी... सर्व उमेदवार निवडून येण्याचे केले आवाहन...रैलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....


सय्यद लईकोद्दीन सरपंचपदी विराजमान होवू शकतात...?
स्वराज्य ग्राम विकास पैनलची प्रचारात आघाडी... सर्व उमेदवार निवडून येण्याचे केले आवाहन...रैलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....
औरंगाबाद, दि.15(प्रतिनिधी)
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दौलताबाद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारात रंगत आली आहे. या निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. चार उमेदवार सरपंच पदाच्या निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहे. स्वराज्य ग्राम विकास पैनलचे उच्चशिक्षित सय्यद लईकोद्दीन सरपंचपदी विराजमान होतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. पैनलचे सर्व अकरा सदस्य निवडून येतील असे आजच्या प्रचार रैलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे दिसून येत आहे. दुपारी चार वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रैलीला ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांचे आशिर्वाद सर्व उमेदवारांनी घेत रैली पुढे गेली. मतदारांनी संधी दिल्यास गावाचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याच्या मुद्यावर व पाण्याची टंचाई होणार नाही आठ दिवसाआड पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. गुळगुळीत रस्ते, सर्व वार्डातील गल्ल्यांमध्ये स्ट्रेट लाईट लावणे, आरोग्य व शैक्षणिक सुविधा, दलित-मुस्लिम सुधार वस्ती, पर्यटन वाढीसाठी व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. येणाऱ्या 18 डिसेंबर रोजी सरपंच पदाच्या सहीत सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आदर्श पाटोदा ग्रामपंचायत बणवण्याचा त्यांचा संकल्प असल्याने मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे. सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 
त्यांच्या पैनलमध्ये राजेंद्र दशरथ हिवाळे, बाबासाहेब रावसाहेब म्हस्के, अख्तर बेगम सय्यद मोईज, सय्यद मोईज सय्यद मुजीब, रवी लक्ष्मण दिवेकर, सरुबाई रामराव आढाव, विलास प्रभात जाधव, पुजा दादाराव आढाव, यमुनाबाई रामराव वरकड, सय्यद नईम अ.गणी, शकुंतला सुरेश ठाकूर हे उमेदवार उभे आहे.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न