लवकरच औरंगाबाद हज हाऊसचे होणार उद्घाटन - हाजी एजाज देशमुख युपिएससी क्लासेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार.

लवकरच औरंगाबाद हज हाऊसचे होणार उद्घाटन - हाजी एजाज देशमुख
युपिएससी क्लासेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार...
औरंगाबाद, दि.23(प्रतिनिधी)
शहरातील कीलेअर्क येथे राज्य शासनाच्या वतीने भव्य हज हाऊसचे काम होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच या वास्तूचे लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल. पुढील वर्षी येथून पवित्र हज यात्रेसाठी यात्रेकरू येथून जाणार आहे. चिकलठाणा विमानतळावरून थेट सऊदी अरब जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त महाराष्ट्र राज्य हज कमेटी सदस्य हाजी एजाज देशमुख यांनी माहिती दिली आहे.
सुभेदारी विश्रामगृहात समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले मुंबई हज हाऊसमध्ये ज्या प्रकारे युपिएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग दिली जाते त्याच धर्तीवर औरंगाबाद येथील हज हाऊस मध्ये विद्यार्थ्यांना हि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरताज खान, साजिद मौलाना, सादीक इनामदार, करंजखेडा येथील सरपंच सय्यद हयास, मजिद खान, शेख सलीम, रियाजोद्दीन देशमुख, आदील पटेल, इरफान खान, फेरोज सरपंच आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न