बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या एकविस वर्षाच्या विद्यार्थ्यांची उद्योगाकडे वाटचाल...वडीलांचे छत्र नसताना आई आणि आजोबांनी हिम्मत दिल्याने युवकाची गगन भरारी...केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले कौतुक...खासदार इम्तियाज जलिल यांनी केले होते प्रोडक्ट लाँचिंग...

बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या एकविस वर्षाच्या विद्यार्थ्यांची उद्योगाकडे वाटचाल...
वडीलांचे छत्र नसताना आई आणि आजोबांनी हिम्मत दिल्याने युवकाची गगन भरारी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले कौतुक...
खासदार इम्तियाज जलिल यांनी केले होते प्रोडक्ट लाँचिंग...
लहान उद्योजकाची स्पेशल रीपोर्ट...

औरंगाबाद शहरातील 21 वर्ष वय असलेले बी.टेक कम्प्युटर मध्ये शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सय्यद साजिद या विद्यार्थ्यांने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जालना शहरातील चंदनझिरा परिसरात  स्वतःचे SM TECHS पावर युएसबी केबल बनवण्याचा छोटा कारखाना सुरू करुन उद्योगाला सुरुवात केली.
मौज मजा करण्याच्या या वयात आजोबांनी दिलेल्या हिमतीवर अनेक जणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिमाखदार योजना आखली.
वडीलांचे छत्र नसताना नातेवाईकांचे टोमने खावून खावून संकल्प केला. जीवनात परिश्रम घेत मागे न बघता पुढे जायचे असा ध्येय बाळगून गगन भरारी घेतली. 
नवीन तंत्रज्ञानाची कास धरत अकरा महीने अगोदर छोट्याशा जागेवर एक मशिनने कम्प्युटर केबल व लैपटाॅप केबल बनवण्यास सुरुवात केली.
आज पर्यंत याच्याशी 15 ते 20 डिस्ट्रीब्युटर जोडले गेले आहेत, यातून संपूर्ण देशभरात आपले पावर केबल सप्लाय करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो.
कच्चा मटेरियल कोठून आणायचे व पैकींग कशी करायची सर्व स्वतः करुन आज बाजारपेठेत त्याने बनवलेल्या केबलची मागणी वाढली आहे.
आज पर्यंत कित्येक तरुणांना येथुन रोजगार उपलब्ध झाला आहे.
महीन्याला लाखोंच्या घरात व्यवसाय सुरू झाला. लाखोंचा व्यवसाय कसा कोट्यवधीत करता येईल यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो.
साजिदचे प्राथमिक शिक्षण ऑक्सफर्ड स्कूल जालना येथे झाले तर अकरावी व बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील डीएफसीत झाले आहे. औरंगाबाद शहरातील एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेज येथे बी.टेकचे  शिक्षण सुरू आहे.
आई श्रीमती शमीम बी व आजोबा दौलतखान पठाण यांनी पालन पोषण करत मोठे केले.  आई व आजोबांना जीवनात काही तरी प्रगती करुन नवीन करुन दाखवण्याची जिद्द व चिकाटी बाळगली.
एवढ्या लहान वयात व्यवसायात भरारी घेणाऱ्या साजिद सय्यदचे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साजिद चे कौतुक करत सांगितले की या वयात एवढी भरारी करणारे साजिद चा आदर्श सर्वच युवकांनी घेण्यासारखे आहे.
IJ फेस्टिव्हल मध्ये खासदार इम्तियाज जलिल यांनी SM TECHS चे प्रोडक्ट लाँचिंग करून या नवयुवकास प्रोत्साहित केले होते, आमखास मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना जिंकलेल्या संघाच्या मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूला साजिद ने बक्षीस दिले होते.
आजोबा दौलतखान पठाण यांनी नेहमी सहकार्य करत जीवनात परिश्रम करुन प्रगती करण्यासाठी परावृत्त केले. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवत आणि "तु काही करू शकत नाही" असे लोकांनी वारंवार सांगितलेले शब्द डोक्यात हिनवुन हा छोटा उद्योग सुरू केला असे साजिद म्हणतो.
भविष्यात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नवीन साॅफ्टवेअर बनवून संगणकीय ट्राव्हल्स सर्विस सुरू करण्याचा माणस आहे. ओला व उबेर सारखी सार्वजनिक वाहतूक सेवा स्वस्तात निर्माण करुन आणखी एक नवीन प्रयोग करण्यासाठी संकल्पना तयार केली असल्याचे साजिदने सांगितले.
या युवकाचा आदर्श आपल्या जीवनात घेत युवकांनी अशी भरारी उद्योग व व्यवसायात घ्यावी. अशी अपेक्षा.....

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न