इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अंबेसेडर ऑर्गनायझेशन तर्फे सोशल प्रोटेक्शन प्रदेशाध्यक्षपदी समाजसेवक साहेबखान यांची नियुक्ती
इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अंबेसेडर ऑर्गनायझेशन तर्फे सोशल प्रोटेक्शन प्रदेशाध्यक्षपदी समाजसेवक साहेबखान यांची नियुक्ती
औरंगाबाद, दि.(प्रतिनिधी)
नारेगाव येथील समाजसेवक साहेबखान पठाण यांना इंटरनैशनल ह्युमन राईट अम्बेसिडर ऑर्गनायझेशनच्या सोशल प्रोटेक्शन प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट मा. अविनाश डी.साकुंदे यांच्या आदेशाने आणि नॅशनल प्रेसिडेंट मा.डॉ. अफसर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली
सुभेदारी विश्रामगृहात राष्ट्रीय उपाध्यक्ष ओसामा नासेर कोयलख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर नियुक्तीपत्र व ओळखपत्र देवून त्यांचे स्वागत केले.
अधिकाराचे हनन झाल्यास पिडीतांना
न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्टाचार संपवणे आणि नशामुक्तिसाठी जोमाने काम करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना यावेळी समाजसेवक साहेबखान पठाण यांनी दिली आहे.
समाजसेवक साहेब खान पठाण यांना दिलेल्या नियुक्तीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे
याप्रसंगी मोहम्मद मजहरुद्दीन, एमडी तय्यब जफर, शेख मजहर, इरफान अन्सारी, युनुसभाई टायरवाले, शरीफ पठाण, महेमुद बेग, सय्यद जफर, युसुफ लिडर, नबिल नासेर कोयलख, शकील अहेमद, आमिन इस्माइल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.