पोलीसांच्या माॅक्ड्रीलमध्ये मुस्लिम द्वेष कशासाठी... कार्यवाही करण्याची उसामा अब्दुल कदीर मौलाना यांची मागणी...
पोलीसांच्या माॅक्ड्रीलमध्ये मुस्लिम द्वेष कशासाठी... कार्यवाही करण्याची उसामा अब्दुल कदीर यांची मागणी...
जीन्सी पोलिस ठाण्यात दिली लेखी तक्रार
औरंगाबाद, दि.20(प्रतिनिधी)
पोलिस विभागाकडून विविध शहरात आतंकी हल्ला झाला तर त्याचा मुकाबला करण्यासाठी व निष्पाप नागरीकांचा जीव वाचवण्यासाठी माॅकड्रील(MOCK DRILL) केले जात आहे पण यामध्ये मुस्लिम द्वेष कशासाठी असा प्रश्न युवा नेते तथा समाजसेवक उसामा अब्दुल कदीर मौलाना यांनी उपस्थित करत अहमदनगर शहरात झालेल्या माॅक्ड्रीलमध्ये "नारे तकबिर अल्लाहु अकबर" च्या घोषणा देण्यात आल्या. ते कशासाठी हे बंद झाले पाहिजे. मुस्लिम पेहराव कशासाठी यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. अहेमदनगर शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या माॅक्ड्रीलचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. गृह मंत्रालयाने याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी लेखी तक्रार जीन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना त्यांनी दिली आहे. कार्यवाही झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार असा इशारा उसामा अब्दुल कदीर मौलाना यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे आतंकवादी विरोधी कार्यवाईच्या माॅकड्रील मध्ये अतिरेक्यांची भुमीका साकारणा-यांनी जाणूनबुजून "नारे तकबिर अल्लाहु अकबर" चे घोषणा देत समाजात वैर आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने धार्मिक भावना दुखावणा-या आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यांनी अल्लाहच्या नावाची घोषणा देत अल्लाह व इस्लाम धर्माचा अवमान केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
राष्ट्रपती, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, औरंगाबाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद यांनी लेखी तक्रार केली आहे.