हिशाम उस्मानी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम...पुष्पगुच्छ, फुल हार न स्वीकारता गरीबांना मदत करुन वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प हिशाम उस्मानी यांनी केल्याने त्यांचे समाजात कौतुक होत आहे.
हिशाम उस्मानी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम...
औरंगाबाद, (प्रतिनिधी)
समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते कट कट गेट येथील औरंगाबाद पब्लिक स्कूल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सय्यद हमीद यांनी केले होते.
याप्रसंगी सय्यद साहिल, वसिम अतार, मोहम्मद ऐतेशाम, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. दुपारी घाटी रुग्णालयात गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना शेख मोहसीन लककी यांनी फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. पुष्पगुच्छ, फुल हार न स्वीकारता गरीबांना मदत करुन वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प हिशाम उस्मानी यांनी केल्याने त्यांचे समाजात कौतुक होत आहे.
याप्रसंगी सय्यद हमीद, शेख मोहसीन, संदीप जाधव, हमीदोद्दीन, जावेद खान, विनोद उंटवाल, आरेफ पटेल, शहेबाज खान, शेख शहेबाज आदी समर्थक उपस्थित होते.