*समाजसेवक शेख रफिक शफियोद्दिन यांना इंडियाज प्राईड अवॉर्ड*
*समाजसेवक शेख रफिक शफियोद्दिन यांना इंडियाज प्राईड अवॉर्ड*
नेताजी सुभाषचंद्र यांचा जयंती निमित्त सोमवारी (दि.२३)भारतीय सिनेयुग प्रोडक्शन अकॅडमी मुंबई तर्फे समाजसेवक शेख रफिक यांना मुंबई येथील अंधेरी मेयर हाल जुहू लाईन इंडियाज प्राइड अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले ,गोरगरीब निराधारांना मदतीचा हात,हिवाळ्यात निराधारांना प्रत्येक वर्षी ब्लँकेटचे वाटप, घाटी रुग्णालयातील रुग्णांना मदतीचा हात ,यासह विविध कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला,
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे, यावेळी निवृत्त न्यायाधीश सी. एल थुल, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, दिग्दर्शक विकास कपूर, अभिनेता किरण माने, अभिनेता कमल घिमिने, गायक पूजा चोपडा , नगरसेवक मोहसीन हैदर, शेख समद पारुंडीकर, यांची उपस्थिती होती.