बुऱ्हाणी नॅशनल उर्दु प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा,आपला मान मराठी, आपली शान मराठी
बुऱ्हाणी नॅशनल उर्दु प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा
आपला मान मराठी, आपली शान मराठी,
जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी
बुऱ्हाणी नॅशनल एज्यूकेशन सोसायटी संचलित बुऱ्हाणी नॅशनल उर्दु प्राथमिक शाळा,
सिटी चौक औरंगाबाद येथे मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ
पुरस्कार विजेते, साहित्यीक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसूमाग्रज यांच्या
जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला यावेळी
कार्यक्रमाची सुरुवात हमज़ाने पवित्र कुरआनचे पठणने झाली मराठी नात शरा
फातेमाने सादर केली सर्व उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
करण्यात आले प्रास्ताविकाचे भाषण आयोजक शेख जावेद यांनी सादर करत मराठी
भाषेला लवकरात लवकर ज्ञान भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न
करावयास हवे असे मत मांडले तसेच विद्यार्थ्यांनी बडबड गीत, सुविचार (अर्थासह),
मराठी कवी व कवयित्रीची वेषभूषा, कविता, भाषण सादर केले मालतीची चतुराई
(नाटक), मुक्या प्राण्यांची कैफियत (नाट् कविता), संत तुकाराम महाराजांचे अभंग,
मिस्टर बीन (हास्य अॅक्ट) व मराठी अभिमान गीत लाभले आम्हांस भाग्य बोलतो
मराठी सादर करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सीईओ डॉ. अनसारी
अबरार अहमद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की, आज शाळेतील
वातावरण मराठीमय झालेले दिसून येत आहे व विद्यार्थ्यांचे सादरीकरण खूपच
उत्कृष्ट होते तसेच मराठी भाषेचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनी नमरा, अश्मिरा व सदफ,