किराडपुरा येथे नामांतर विरोधी हरकती अर्ज भरण्याची सुरुवात...जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती दाखल करण्याचे इब्राहिम पटेल यांचे आवाहन...

किराडपुरा येथे नामांतर विरोधी हरकती अर्ज भरण्याची सुरुवात...
जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती दाखल करण्याचे इब्राहिम पटेल यांचे आवाहन...
औरंगाबाद, दि.14(प्रतिनिधी)
केंद्र व राज्य सरकारने औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद शहर, औरंगाबाद तालूका व औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात नामांतरास विरोध करण्यासाठी याचिका दाखल आहे. 27 मार्च पर्यंत नामांतरावर जनतेच्या हरकती शासनाने मागवलेल्या आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या नामांतराच्या विरोधात हरकती दाखल कराव्यात असे आवाहन किराडपुरा येथील माजी नगरसेवक तथा जेष्ठ समाजसेवक इब्राहिम भय्या पटेल यांनी केले आहे. त्यांनी मागणी केली ऐतिहासिक 



औरंगाबादचे नाव बदलण्यात येवू नये. यामुळे आजपासून त्यांच्या संपर्क कार्यालयात हरकती अर्ज भरण्याची सुरुवात करण्यात आली आहे. औरंगाबाद बचाओ संघर्ष समितीच्या वतीने कैम्प सुरू केले आहे. किराडपुरा, अल्तमश काॅलनी रहेमानिया काॅलनी, शरीफ काॅलनी, बारी काॅलनी व परिसरातील नागरिकांनी या कैम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबत आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणावी.
त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि नामांतरावर काही राजकीय पक्ष राजकारण करत आहे. हे शहर नेहमी शांतताप्रिय राहिलेले आहे. सर्व जाती धर्मातील लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. शहराचे वातावरण खराब होऊ नये यासाठी युवकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. या प्रकरणात न्यायालयात न्याय मिळेल व शहराचे ऐतिहासिक औरंगाबाद नाव नेहमी राहिल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. यामुळे एकजुटीने हरकती दाखल करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी अलीबाबा, ताहेर पटेल, तय्यब पटेल, रफीक पटेल, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, शहेबाज पटेल, तौहिद पटेल, शेरखा पटेल, शेख नईम, शेख आरेफ, शेख आसेफ, हाजी लुकमान, सय्यद जाविद, सदफ पटेल, शेख करीम, शेख फेरोज, सय्यद जफर पोलोदकर, शेख जहुर मुसा उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न