औरंगाबादचे कलावंताच्या मुख्य भूमिकेत "शिव आर्यन" हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला,आर्यन खान फिल्म प्रोडक्शनची निर्मिती.
औरंगाबादचे कलावंताच्या मुख्य भूमिकेत "शिव आर्यन" हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला,आर्यन खान फिल्म प्रोडक्शनची निर्मिती.
औरंगाबाद : कलावंताना मुंबई-पुणे यासारख्या शहरात जाऊन चित्रपट क्षेत्रात आपले भविष्य घडवावे लागते. त्यामुळे स्थानीक कलावंताना संधी देऊन मराठवाड्यातील कलावंत रुपेरी पडद्या वर झळकावेत या उद्देशाने आर्यन खान फिल्म प्रोडक्शन च्या वतीने "शिव आर्यन" या हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून या द्वारे मराठवाड्यातील अस्सल कलावंताना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेले अभिनेते अस्लम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोहेल खान, शेख सलमान यांची निर्मिती असलेल्या या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन राझुल आलम (मुंबई) यांनी केले असून यामध्ये सविता भोसले, अस्लम खान, राजश्री पराठ, झिनत खान,साजेद जहागीरदार, प्रा. लतीफ कुरेशी, प्रतिभा आहेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लव्ह स्टोरी बरोबरच या चित्रपटात कॉमेडी, मर्डर मिस्री तसेच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे कथानक असून प्रेक्षकांना ते नक्कीच आवडतील असा विश्वास या वेळी अभिनेते अस्लम खान यांनी व्यक्त केला.
संपती मिळविण्यासाठी नात्यामध्ये निर्माण झालेली कटुता आणि त्यातून घडणाऱ्या विविध घटना या चित्रपटात जमेच्या बाजू असल्याचे ते म्हणाले. चित्रपटाचे कथानक हे सस्पेन्स थ्रिलर असून चित्रपट गृहातून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना ते नक्कीच विचार करायला प्रेरित करतील असेही अभिनेते अस्लम ख्यान यांनी सांगितले. "शिव आर्यन" हा चित्रपट मराठवाड्याच्या आणि ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील कलावंतांचे प्रतिनिधित्व देशपातळीवर करेल असे स्पष्ट करून चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांवर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू भक्कम असून मुंबई,
पुणे येथील तंत्रज्ञ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. चित्रपटातील गीतांना सुरेश घायवट यांनी संगीतबद्ध केले असून नामवंत गायकांनी आपला स्वरसाज चढवला आहे.
या चित्रपटाचे ६० टक्के चित्रीकरण औरंगाबादेत झाले असून मराठवाड्याच्या मातीतील अस्सल कलाकृती लवकरच भेटीला येणार असल्याचे दिग्दर्शक राझुल आलम म्हणाले. हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटासाठी शेख सलमान यांचे दौलताबाद येथील वेलकम फार्म हाउस, माउंट विव्ह, स्वागत फार्म हाऊस यांनी विशेष सहकार्य केले आहे.