सईदा काॅलनी येथे नवीन ड्रेनिजलाईनचे उद्घाटन... प्रदीप जैस्वाल यांची केली लाडूतूला फटाक्यांची आतिषबाजी करत केले जंगी स्वागत
सईदा काॅलनी येथे नवीन ड्रेनिजलाईनचे उद्घाटन... प्रदीप जैस्वाल यांची केली लाडूतूला
फटाक्यांची आतिषबाजी करत केले जंगी स्वागत
औरंगाबाद:(प्रतिनिधी) शहरातील वार्ड क्रमांक 4 राजनगर-चेतनानगर येथील सईदा काॅलनी येथील नागरिक ड्रेनिजलाईन नसल्याने अनेक वर्षांपासून यातना भोगत होते. रस्ते व पायाभूत सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आज दुपारी औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी 90 लाख रुपये निधी ड्रेनिजलाईन व 60 लाख रुपये निधीत रस्त्याचे भुमिपूजन केले असल्याने येथील नागरिकांनी लाडूतूला करत फटाक्यांच्या आतिषबाजी करत जंगी स्वागत केले. यावेळी येथील प्रतिष्ठित नागरिक व रहिवासी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अब्दुल रऊफ, मा. नगरसेवक सय्यद मतिन, समाजसेवक साजिद मौलाना, शेख नाजिम, शेख मोईनोद्दीन लकी, सईदा काॅलनी विकास समितीचे अध्यक्ष पत्रकार शेख मजहर, समन्वयक पत्रकार आरेफ देशमुख, शेख हमीदोद्दीन, सय्यद साबेर, जफर देशमुख , शहेबाज देशमुख, जावेद मेमन, सय्यद महेमूद, याकूब खत्री, इद्रीस खत्री, रहेमान खत्री, अखलाक देशमुख, शेख मोहसीन लकी, शेख मोबीन, अलीम हाफीज साहेब, शारदा घुले, शिंदे मैडम, विश्वनाथ राजपूत, शिवाजी सिरसाट, युवराज, वाकेकर आदी उपस्थित होते.
आमदार जैस्वाल यांचे वार्डातील चौकात बैनर लावून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघासाठी आतापर्यंत विकासासाठी दोनशे कोटी निधी दिला. येथील नागरिकांची मागणी आहे कब्रस्तान व स्मशानभूमीसाठी जागा पाहीजे त्यासाठी पाठपुरावा करु. जात धर्म न बघता सर्व जाती धर्मातील लोकांचे कामे करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. जो शब्द दिला तो पाळण्याची माझी सवय आहे. सईदा काॅलनी येथील सर्व समस्या सोडवले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
या वार्डात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या निधीतून एकूण 5 कोटी 10 लाख निधीच्या विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सईदा काॅलनी ड्रेनिजलाईनसाठी 90 लाख, रस्त्यासाठी 60 लाख रुपये, हरिओमनगर रस्त्यासाठी 50 लक्ष, दत्तनगर रस्त्यासाठी 20 लक्ष, सांगळेनगर रस्त्यासाठी 30 लक्ष, रमाईनगर रस्त्यासाठी 20 लक्ष, अंबरहिल रस्त्यासाठी 20 लक्ष, जिजाऊ भोसले काॅलनी रस्त्यासाठी 10 लक्ष, सुधीर हनुमाननगर रस्त्यासाठी 10 लक्ष निधीच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले.