महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मान्यता प्राप्त युनियन तर्फे कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मान्यता प्राप्त युनियन तर्फे कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .
भारतीय स्वतंत्रदिना निमित्त १५/ऑगस्ट/२०२३ रोजी एक्सीडी इंडिया लिमिटेड MIDC चिकलठाणा औरंगाबाद येथील कामगारांच्या मुलांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर्व प्रथम प्रमुख पाहुणे सतनामसिंग गुलाटी साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डॉ. शिवाजी कान्हेरे साहेब मराठवाडा सचिव ( जालना व बीड विभाग ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना औरंगाबाद अरविंद धीवर साहेब, व कार्यक्रमाचे उदघाटक नितीन कौसाडीकर साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर गिरीश काळे साहेब जनरल मॅनेजर EXIDE इंडिया लिमिटेड, परवेज़ कमर साहेब असिस्टंट जनरल मॅनेजर, मधुकर रंननवरे साहेब सिनिअर HR मॅनेजर, राम करतडे साहेब ऑफिसर HR DEPT. हे उपस्थित होते. या कार्यक्रमास गणेश राजळे,राहुल कुलकर्णी,प्रसेन कुलकर्णी,मुकुंद कोकणे, युनूस पठाण,सुनील सुरासे, राजू जैस्वाल, संदीप बेदरकर, सुहास ठोसर, विष्णू वाघ, बन्सीलाल वाघ, राजपूत, बळणाथ सोनावणे, विश्वंभर पवार व ईतर कामगार या कार्यक्रमा साठी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच गुणवंत विद्यार्थी ओम कंगळे, सुजल तांडूरे, मानसी काळे, स्नेहल पवार, स्वरा तांडूरे, जय आणि विजय अहिरे, मयूर इंगळे, श्रेया कंगळे, स्वरांगी कुलकर्णी, श्रावणी कुलकर्णी, विवेक गाडेकर, स्नेहा शिंदे, प्रतीक राजळे, केदार शिंगणे, इशिता रंजलकर (10 वी ला 94%), अथर्व वाघ(12 वी ला 83 %), असे एकूण 130 कामगारांच्या मुलांचा व पालकांचा सत्कार व्यासपीठावर उपस्थित असेल्या पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विवेक कंगळे यांनी केले, व अभार प्रदर्शन सुजित तांडूरे यांनी केले. शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी EXIDE इंडिया लिमिटेड महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मान्यता प्राप्त युनियनचे अध्यक्ष सुजित तांडुरे, सचिव अनिल शिंदे,सहसचिव दिनेश अहिरे, उपाध्यक्ष किशोर शिंगणे, कोषाध्यक्ष विवेक कंगळे, सहकोषाध्यक्ष अनंत दंडुके, भगवान इंगळे,रवी खंदारे, उल्हास चौधरी, दिगंबर गिरी, दिगंबर भाले यांनी परिश्रम घेतले.