स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय 5%आरक्षण...!


 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय आरक्षण...!



औरंगाबाद- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी सरकार व निवडणूक आयोगाकडे पत्रकार परिषदेत काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी केली आहे.
यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवेची संधी द्यावी. दिव्यांगांना मत देण्याचा अधिकार आहे परंतु घेण्याचा अधिकार देण्यासाठी राजकीय पक्षांनी सुध्दा राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जसे एससी, एसटी ओबीसी, महीलांसाठी वार्ड व प्रभाग आरक्षित केले जाते मग दिव्यांगांसाठी का नाही असा सवाल उपस्थित केला. 5 टक्के आरक्षण मिळाले तर आपल्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयात उंबरठे झिजवायची गरज पडणार नाही. दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिव्यांगांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी झाले तर प्रश्न सुटतील म्हणून सर्व राजकीय पक्षांचे दिव्यांग सेलचे शहराध्यक्षांनी एकजूट दाखवून हि मागणी केली. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.





Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न