मराठा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन संपन्नव्याख्यान,मेळावा आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद
मराठा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन संपन्न
व्याख्यान, मेळावा आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : मराठा अधिकारी व कर्मचारी संघ, भारत यांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी प्रबोधन आणि सामाजिक हित जपत व्याख्यान, मेळावा, गुणवंत पाल्याचा सन्मान आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष लक्ष्मण खटिंग, सचिव अनिल पाटील , उपाध्यक्ष पंढरीनाथ वाघाडे, हनुमंत येवले, रावसाहेब जंगले, मुकुंद खिस्ते, सुरेश कुंदे, अनिल बावणे, गोविंद तांगडे, मुंजा गिराम, संजय घोलप, कृष्णा दुधाटे, गोवर्धन टेमक , गोविंद मुळे, दशरथ ढोले, एकनाथ बेलेकर, सचिन पाटील, किसन तुपे यांनी परिश्रम घेतले.
- घाटीच्या रक्तपेढीचे विशेष सहकार्य -
छत्रपती संभाजीनगर येथील
विभागीय रक्त केंद्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, रक्तपेढीच्या डॉ. अंजली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम गुसिंगे, डॉ. झोहरा, डॉ. नम्रता राठोड, तंत्रज्ञ पाध्ये, समुपदेशक कोकिळा साबळे, अंजली, कुशल, संदीप, सरफराज, मजहर शेख यांनी सहकार्य केले.