जागतिक रक्तदान दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त २१ दात्यानीं केले रक्तदान. शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप.
जागतिक रक्तदान दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त २१ दात्यानीं केले रक्तदान. शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप.
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रक्तपेढी घाटी येथे भव्य रक्तदान शिबिर घेन्यात आले. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भरतभाऊ कल्यानकर याच्यां तर्फे अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आयोजित भव्य रक्तदान शीबिरात
२१ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले डॉ कैलास झिने साहेब,प्रा विभागप्रमुख घाटी,पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार,साय्यक पोलीस निरिक्षण हरेश्वर घुगे, उपपोलीस निरिक्षक विशाल बोडखे,डॉ अनिल जोशी,यांनी गाडगेमहाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले कि, कुठलाही वाज्यागाज्या न करता जे सामाजिक कार्य माणुसकी समुहातर्फे जे सामाजिक कार्य तुम्ही करत आहात ते मानवीय कार्य सर्वोत्तम आहे,आज जे समाजात डीजे, बँड,केल,पार्टी,वाढदिवसावर होणारा फालतु खर्च टाळून जर प्रत्येकाने सामाजिक कार्यात हातभार लावला तर निश्चितच गोरगरिबांना फायदा होईल.या रक्तदान शिबिरात उद्घाटक म्हणुन लाभलेले डॉ. कैलास झिने यांनी देखील रक्तदान केले.मुक्ताराम गव्हाणे,सुमित पंडित,शेख रफिक,जगन शिरसाट,सचीन वाघ,रोहित गव्हाणे,आदि सह २१ दात्यांनी रक्तदान केले.
समाजसेवक सुमित पंडित यांनी जागतिक रक्तदानाविषयी जनजागृती करून लोकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांची १ महिना २१ दिवस सलुन सेवा मोफत करुन देण्याचे सांगितले. रक्तदाते वाढावे व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे म्हणून छोटासा प्रयत्न केला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी रुग्णसेवा समूह व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी सहकार्य केले. त्यामध्ये समाजसेवक सुमित पंडित,
लक्ष्मण शिंदे पोलीस (ASI),
भरतभाऊ कल्यानकर,शेख रफिक,राम पंडित,समाजसेविका सौ.पुजा पंडित,प्रवीणा अन्नदाते,डॉ रंजना प्रशांत दंदे, लक्ष्मी पंडित,आदिंनी सहकार्य केले.
रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढी तर्फे डॉ.प्रगती फुलगीरकर,डॉ. सुनिता शेरे,डॉ.सुनीता बनकर जनसंपर्क अधीकारी,डॉ शितल सावंत,सह आदिनीं सहकार्य केले.